- उदगीर एका दिवसात 12 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू, विरोधी नेत्यांनी उडवली डॉक्टरांची झोप!
- :- रुग्णाच्या वाढत्या परेशानी ने भाजपा, कॉंग्रेस व एम आइ एम चे कोविड रुग्णालयातील डॉक्टरांना घेराव, डॉक्टरांची बोलती बंद
उदगीर :- उदगीर येथील 52 साब पैकी 12 जनाचे कोरोंना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे माहिती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले तर कोविड रुग्णालयातील रुग्णाच्या हेळसांड बद्दल येथील विरोधी पक्षांनी एकत्र येत येथील डॉक्टरांना घेराव घालून प्रश्नाचा भडीमार करताच उपस्थित डॉक्टरांची बोलती बंद झाल्याचे दिसून आले
उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर स्थापन करण्यात आले असून येथे पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार केले जातात, मागील काही दिवसांपासून येथील रुग्णाचे अतोनात हाल होत आहेत तर येथील रुग्णास पाणीही पिण्यास मिळत नाही असे आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता पण येथील डॉक्टर हे हुकूमशहा सारखे वागतात म्हणुन आज सोमवार सकाळी 11-30 च्या सुमारास भाजपा चे नगराध्यक्ष बसवराज बागबन्दे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामेश्वर पवार, दत्ता पाटील,राजकुमार मुक्कावार, गणेश गायकवाड, उदय ठाकूर कॉंग्रेस चे फैजूखान पठाण, मंजूरखान पठाण , महमद जरगर एम आइ एम चे शैख फयाज, सनाउल्लाखान, साबेर पटेल सोबत मोती डोईजोडे सोबत अनेक जनानी येथील डॉ, हरिदास व नोडल अधिकारी डॉ देशपांडे याना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती करताच संबंधित डॉक्टरांची बोलती बंद झाल्याचे दिसून आले तर येथुन काल रविवारी 52 रुग्णाचे साब तपासणी साठी पाठविण्यात आले होते त्या पैकी 12 चे आवाहाल पॉझिटीव्ह आल्याचे माहिती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात किल्ला गल्ली 1,उमा चौक 1,सहयोग नगर 1,शिवशक्ति नगर 1,रेड्डी कॉलनी 2,कबीर नगर 1,एस टी. कॉलनी 3,तळवेस 1 व अम्बेडकर सोसाइटी 1 आहेत तर हावगीस्वामी कॉलेज बाजू 1 पुरुष तर मोमीन पूरा येथील 1 महिलेचा मृत्यू झाला आहे