उपमा मध्ये टिड्डी (घोडा ) तर भाजीत माश्या, कोविड अलगीकरण सेंटर मधील प्रकार
:- कोविड रुग्णाच्या जेवणाचे व नाष्ट्या चे हाल, तहसीलदार वेंकटेश मुंडे यांची ठेकेदारावर कार्यवाही करण्याचे आश्वासन
उदगीर :- येथील तोंडार पाटी येथील कोविड अलगिकरण कक्षात आज शनिवारी देण्यात आलेल्या नाष्ट्यात घोडा (टिड्डी ) तर संध्याकाळी जेवणातील भाजीत चक्क माश्या आल्याने तेथील रुग्णांत एकच हाहाकार माजल्याचे काही रुग्णांनी उदगीर समाचार ला फोन लाऊन सांगितले
तोंडार पाटी येथील कोविड सेंटर मध्ये आज 31 जुलै रोजी सकाळी दिलेल्या नाष्ट्यात चक्क मृत घोडा (टिड्डी ) आला तर संध्याकाळी जेवणाच्या भाजी च्या पाकिटात चक्क माश्या आढळून आल्याने तेथील रुग्णांत एकच खळबळ उडाल्याचे तेथील काही रुग्णांनी उदगीर समाचार ला फोन लाऊन सांगितले असता या बाबत तहसीलदार वेंकटेश मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित ठेकेदारास ताकीद दिल्याचे सांगितले असून असे प्रकार पुढे होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे ही संबंधितास सांगितल्याचे त्यांनी सांगितले आहे