अत्यावश्यक सेवेला काही अटी घालून सुट, विनाकारण बाहेर फिरू नका :- उपजिल्हाधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी
:- किराना व्यापारी, भाजी विक्रेत्याना प्रशासनाची सक्त ताकीद
उदगीर :- प्रशासनाने किराना दुकान, दूध भाजी पाला यास काही अटीवर सकाळी 7 ते 12 वाजे पर्यंत घरपोच पुरवठा करण्यास सुट दिली असून अत्यावश्यक असेल तरच नागरीकानी घरा बाहेर पडावे अन्यथा घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उदगीर चे उपजिल्हाधिकारी डॉ. प्रविण मेंगशेट्टी यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना येथील नागरिकांना केले आहे
उदगीर शहर व तालुक्यात मंगळवार 21 जुलै पासून ते 30 जुलै पर्यंत प्रशासनाने काही अंशी सुट दिली असून यात किराणा सामान घरपोच सेवा देणे आहे, दूध, भाजी विक्री ही घरपोच असून कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, प्रशासनाने जे नियम लाऊन अत्यावश्यक सेवेला सुट दिली आहे त्याचे पालन करावे अन्यथा आम्हास कडक पाउले उचलावी लागतील असे ही त्यांनी बोलताना सांगितले येथील नागरिक हे जबाबदार नागरिक आहेत ते नक्कीच नियमाचे पालन करतील यात मला शंका नाही प्रशासन कोरोंना वर मात करण्यासाठी सदैव तत्पर आहे आपल्या सर्वाची साथ जरूरी असल्याचे सांगत उपजिल्हाधिकारी डॉ प्रवीन मेंगशेट्टी यांनी हे आवाहन केले आहे ते उदगीर समाचार सोबत बोलत होते.