श्यामलाल ची मान्यता रद्द करणार का माध्यमिक शिक्षण अधिकारी उकिरडे?
:श्यामलाल शिक्षण संस्थेस शिक्षण अधिकाऱ्याने 5/6/2020 ला पत्र देऊन पत्र मिळाल्या पासून 3 दिवसात खुलासा करण्याचे दिलेआदेश,नाहीतर मान्यता रद्द?
:शिक्षण विभागाच्या पत्रा नंतर संस्थेने 3 मुख्याध्यापकाची नियुक्त केली पण आम्ही मंजुरी दिलेली नाही :उकिरडे
उदगीर येथील श्यामलाल शिक्षण शासनाचे आदेश धुडकावून संस्थेने आपल्या मर्जीतील व्यक्तीस अल्प काळासाठी मुख्याध्यापक नियुक्त करणे, अतरिक्त 18 शिक्षाना रुजू करून घेण्यास करण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी 5/6/2020 ला पत्र देऊन संस्थेची मान्यता रद्द करण्यात का येऊ नये म्हणून दिले पण महिना होत असून आज पर्यंत काहीच कार्यवाही दिसत नाही
उदगीर येथील श्यामलाल शिक्षण संस्थेच्या श्यामलाल मेमोरियल हायस्कूल, शामार्य कन्या विद्यालय उदगीर व शिवाजी विद्यालय रोहिणी ता. चाकूर या तीन शाळा पैकी दोन शाळेत एकूण 18 सहशिक्षकाचे पद रिक्त आहेत कार्यालयाकडून 2013-14 ते 2018-19 या वर्षातील संच मान्यता नुसार अतरिक्त असलेल्या शिक्षकांना वेलो वेली समायोजन केले परंतु एकाही अतरिक्त शिक्षकाला रुजू करून घेतले नाही, तर संस्थाअंतर्गत 3 शाळेत मागील अनेक वर्षांपासून नियमित मुख्याध्यापकाची नियुक्ति केली नाही, 3-6 महिन्या नंतर नवीनच प्रभारी मुख्याध्यापकाची नियुक्ती केली जाते या मुळे शालेय कामकाजावर परिणाम होत आहे, शिक्षण विभागाने अनेक वेळेस आदेश देऊन ही संस्था शासनाच्या आदेशाचे पालन करत नाही म्हणुन हे पत्र मिळताच 3 दिवसात सर्व बाबीचा खुलासा करावा अन्यथा आपली मान्यता का रद्द करण्यात येऊ नये असे पत्र दिले खरे पण आज एक महिना होत असून संस्थेने काहीच उत्तर न दिल्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी उकिरडे यांनी उदगीर समाचार ला सांगितले आहे, आता तरी या संस्थे वर काही कार्यवाही होते किंवा प्रत्येक वेळे प्रमाणे या आदेशास संस्था कोळून पिते हे पहावे लागेल