उदगीर :- उदगीर येथील कोविड रुग्णालयातील रुग्णास नरक यातना भोगाव्या लागत असताना सुद्धा मागील 4 महिन्या पासून येथील कर्मचारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कसे दिसत नाही हा प्रश्न काल एका रुग्णाने विडिओ काढून सोशल मीडिया वर टाकल्या नंतर सर्वाना पडल्याचे दिसत आहे
उदगीर येथील कोविड रुग्णालयात संडास बाथरुम ला दरवाजे नाहीत येथे आता पर्यंत 200 च्या वर रुग्ण दाखल करण्यात आले आहेत यात अनेक महिला होत्या तर काही पुरुष पण स्वच्छता गृहाला दरवाजे नसल्याने त्यांनी येथे कसे दिवस काढले असतील याचा विचार न केलेला बरा, काल येथील एका रुग्णाने येथील सर्व बाबीचा विडिओ काढून सोशल मीडिया वर वाईरल करून तेथील नरक यातना समोर आणली येथील बाथरुम मध्ये स्वच्छताच नाही, कोविड रुग्णांना स्वच्छता सर्वात महत्त्वाची असून या बाबींकडे येथील प्रशासन कानाडोळा करून रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार केल्याचे दिसत असून ही या दवाखान्याचे प्रमुख सार्वजनिक बांधकाम विभागा कडे बोट दाखवून मोकळे झाले आहेत, तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे कानावर हात ठेवले असून आम्ही पाहूत करूत असी भाषा करत आहेत, कोरोंना रुग्णालया साठी शासन अनेक रुपये खर्च करत असताना येथील या दवाखान्याची खराब हालत पाहून हे रुपये कुठे खर्च केला असा प्रश्न उपस्थित होत आहे, तर या कोविड रुग्णालयात व येथील रुग्णावर झालेल्या खर्चाचा तपशील समोर आल्यास फार मोठा घोटाळा समोर आल्या शिवाय राहणार नाही असे अनेकांचे म्हणणे आहे