राज्यमंत्री संजय बनसोडे होम कोरंटाइन
उदगीर :- उदगीर चे आमदार तथा राज्यमंत्री संजय बनसोडे याना डॉक्टरानी होम कोरंटा होण्याचा सल्ला दिला असून ते होम कोरंटाइन आहेत
येथील आमदार तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उदगीर समाचार ला सांगितले की खबरदारी म्हणुन मी चाचणी करून घेणार असून माझी तब्यत ठीक असून डॉक्टरांनी दहा दिवसा साठी होम कोरंटाइन होण्याचा सल्ला दिला असून मी मुंबई येथील घरी होम कोरंटाइन आहे, या कालावधीत मला सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहता येणार नाही, जनतेने शासनाच्या आदेशाचे पालन करावे, सामाजिक अन्तर राखावे , मास्क चा वापर करूनच आवश्यक असेल तर घरा बाहेर पडावे असे ही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जनतेला आवाहन केले आहे