उदगीर :आज मंगळवारी सकाळी 11 वाजता उदगीर शहर पोलीस ठाण्या समोरून शासनाचे आदेश धुडकावून अनेक ऑटो हे 4,5 प्रवासी ऑटो रिक्षा मध्ये बसउन बिन दिक्कत जात असल्याचे पाहून चक्क गाढवानेच ऑटोरिक्षा रोकल्याचे पाहावयास मिळाले
शासनाचे कडक निर्बंध असताना आज शहरात लॉक डाउन चा पूर्ण फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते त्यात आज मंगळवार सकाळी 11 ची वेळ उदगीर शहर पोलीस ठाण्या समोरून अनेक ऑटो हे शासनाच्या लॉक डाउन चा आदेश धुडकावून आपल्या ऑटो मध्ये 4,5 प्रवाशांना बसउन बिनदिक्कत जात होते, येथे ना पोलीस कर्मी होते ना ट्राफिक पोलीस किंवा दररोज मोठ्या थाटात दंड वसूल करणारे नगर पालिका कर्मचारी या मुळे आज ऑटो चालक काही दिवसाची कसर भरून काढत असताना हे सर्व प्रकार गाढवास सहन न झाल्याने त्याने ऑटो मध्ये 4 पॅसेंजर घेऊन जाणार्या ऑटोस अडविले अणि जेंव्हा ऑटो मधील 2 जण उतरून खाली आले तेंव्हाच ऑटो रिक्षा सोडला हे सर्व काही अनेक जण थांबून पाहात होते त्यात काही पत्रकार ही होते, सर्वानी गाढवाचे कौतुक करत बाजारातील झालेल्या गर्दी बदल व उद्या किती नवीन रुग्ण येतील हे विचार करत निघून गेले