उदगीर बनलें अवैध धंद्याचे आगार, गल्लीत गुटका, चौकात मटका तर वेशीवर जुगार!
:- येथुन 3 राज्यात पुरवला जातोय गुटखा, गुटखा किंग म्हणतो माझे कोणीही काहीच वाकडे करू शकत नाही
उदगीर :- एके काळी शिक्षण पंढरी, ऐतिहासिक नगरी असलेले उदगीर शहर आज अवैध धंद्याचे केंद्र बनल्याचे दिसत असून ही प्रशासकीय अधिकारी मूग गिळून गप्प असल्याने हे धंदे बंद होणे तर दूरच फोफावत असल्याचे दिसत आहे
एके काळी उदगीर शहराचे नाव हे शैक्षणिक पंढरी म्हणुन घेतले जायचे, या शहरास ऐतिहासिक नाव आहे पण मागील काही काळापासून या शहराची वाटचाल ही अवैध धंद्या कडे होताना दिसत आहे, येथील गल्ली गल्लीत गुटका खुले आम विक्री होताना दिसत आहे एवढेच नव्हे तर येथील गुटखा व्यापारी गुटखा तीन राज्यात पाठवत असल्याची चर्चा जोरात चालू आहे, चौका चौकात मटका चालू असून मोल मजुरी करणारे दिवस भर मजुरी करून येणारी मजुरी मटक्यात व गल्लीतच उपलब्ध दारूत घालत असल्याने त्यांचे कुटुंब परेशान दिसत आहे तर उदगीर च्या वेशीवर जुगार खेळण्यासाठी पर राज्यातून जुगारी येथे येत असल्याचे ही सांगितले जाते, या धंद्या मुळे शहरात अवैध धंद्याची सध्या चलती दिसत असून या मुळे अनेकांचा खिसा कसा गरम होत आहे याची चर्चा जोरात चालू असल्याचे दिसत आहे. तर काही अधिकारी आम्ही किती तत्पर आहोत हे दाखवण्यासाठी छोटी कार्यवाही करून मोठी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत असल्याची चर्चा जोरात चालू असल्याचे ऐकण्यात येत आहे