सावधान फेसबुक हैक करून लुबाडण्याचे प्रकार
:-उदगीर येथील अनेकांना मैसेज करून पैसे मागितले
:- सध्या फेसबुक हैक करून मित्राच्या नावाने अडचण दाखवुन हैकर पैसे पाठवण्याचे मैसेज पाठवीत असून कोणीही अश्या मैसेज ला प्रतिसाद देऊ नये मधुकर जवळकर (उप विभागीय पोलीस अधिकारी उदगीर )
उदगीर :- येथील व्यापारी अमोल राठी यांचे फेसबुक हैक करून त्यांच्या मित्रांना मी अडचणीत असून 10000 रुपये पाठवण्याचे मैसेज हैकर ने केले खरे पण अमोल च्या सावधगिरी ने हा प्रकार उघडकीस आला आहे
उदगीर येथील व्यापारी अमोल राठी यांचे फेसबुक हैकर ने हैक केले व त्या फेसबुक चे प्रोफाईल पिक्चर वापरून त्यांच्या अनेक मित्रांना मॅसेजे करून मला अडचण आहे त्वरित 10000(दहा हजार )रुपये गूगल पे ने 7699160954 या नंबर वर पाठवा म्हणुन सांगितले, एका मित्राने मी बाहेर आहे म्हणताच तुमच्या त्या मित्रास पाठवन्यास सांगू का म्हणुन मॅसेज केला असता मित्राने अमोल ला काय अडचण आहे म्हणुन फोन केला असता सदरील प्रकार फ्रॉड असल्याचे समजताच गूगल पै करा म्हणालेला 7699160954 नंबर वर कॉल करताच तो नंबर बंद करून टाकला, अमोल ने आपल्या सर्व मित्रांना सुचना दिल्या असून फेसबुक हैकर चा हा प्रकार असून कोणीही अश्या भूल थापाना बळी पडू नये म्हंटले आहे, या बाबत उदगीर चे उप विभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर यांनी ही सर्वांना आवाहान केले आहे की सर्वानी सावधगिरी बाळगावी व अश्या लुटी पासुन सावधान राहावे