राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण, मुंबईत उपचार सुरु
राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री व उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांचा कोरोना संबंधीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या नागरीकांनी स्वतःची काळजी घ्यावी. कोरोनाची लक्षणे असतील तर तातडीने रुग्णालयात जावे, असे आवाहन श्री. बनसोडे यांनी केले आहे
दोन दिवसापूर्वी त्रास होवू लागल्याने स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सध्या ताप आणि अंगदुखीचा अधिक त्रास होत आहे. उपचार सुरु आहेत. लवकरच बरा होवून नंतर उदगीरच्या नागरीकांच्या सेवेत रुजु होणार आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या नागरीकांनी मात्र काळजी घ्यावी. त्रास होत असेल तर तातडीने शासकीय रुग्णालयात जावून उपचार घ्यावेत,मी ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही असे उदगीर समाचार सोबत बोलताना संजय बनसोडे यांनी
सांगितले