पत्रकार भवनाच्या जागेसाठी पत्रकाराचे राज्यमंत्र्यांच्या कार्यालया समोर बेमुदत उपोषण
:- पत्रकार आता आरपार च्या भूमिकेत
उदगीर :येथील पत्रकार भवनाला जागा देण्याचे आश्वासन देऊन ही आज पर्यंत जागा उपलब्ध करून न दिल्याने सर्व पत्रकार राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उदगीर येथील कार्यालया समोर 27 जुलै पासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री, राज्यमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस स्टेशन याना दिले असून या वर 49 पत्रकारांच्या सह्या आहेत
उदगीर येथे पत्रकार भवन व्हावे म्हणुन पत्रकारानी मागील 40 वर्षात अनेक आंदोलने केली, तत्कालीन मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी त्या वेळी पत्रकार भवन साठी 1 लाख रुपयांची मदत निधी टोकन म्हणुन दिला होता, पत्रकार भवन साठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन ही जागा दिली नाही म्हणुन पत्रकारानी जानेवारी 2020 मध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू केले होते त्या वेळेस राज्यमंत्री संजय बनसोडे, नपा मुख्याधिकारी भारत राठोड यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पत्रकार भवनास त्वरित जागा उपलब्ध करून देउ असे आश्वासन देऊन उपोषनाची सांगता केली पण आज पर्यंत मंत्री महोदयानी आश्वासनाची पूर्तता केली नाही, तसेच मुख्याधिकारी यानी ही पाठ फिरवली त्यामुळे पत्रकारांना परत आंदोलन करण्याची वेळ आली असून पत्रकार भवनास त्वरित जागा उपलब्ध करून नाही दिल्यास येथील सर्व पत्रकार सोमवार 27 जुलै 2020 पासून राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उदगीर येथील कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू करतील असे निवेदन मुख्यमंत्री, राज्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, अध्यक्ष तथा मुख्याधिकारी नपा व पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन उदगीर याना दिले असून या निवेदनावर पत्रकार राम मोतीपवले, व्ही. एस. कुलकर्णी,सुरेश पाटील, अर्जुन जाधव, अनिल जाधव, अशोक कांबळे, विश्वनाथ गायकवाड, मंगेश सुर्यवंशी, सुनील मादले, महादेव घोणे, बसवेश्वर डावले, विक्रम हलकीकर, अँड. गोविंदा सोनी, रामविलास नावंदर, राजीव किणीकर, अँड. श्रावणकुमार माने, नीलेश हिप्पळगावकर, सुधाकर नाईक, सुनील हवा,मादळे जयकुमार, महेश मठपति, अशोक तोंडारे, बबन कांबळे, माधव रोडगे, प्रभुदास गायकवाड, शाहूराज कीवंडे, राम जाधव, भगवान सगर, नागेंद्र साबने, युवराज धोतरे, विनायक चाकूरे, संजय वाघे, श्रीनिवास सोनी, अंबादास आलमखाने, बीबीशन मद्देवाड, सचिन शिवशेटे, सिद्धार्थ सुर्यवंशी, गंगाधर भेंडेगावकर, इरफान शैख, निवृत्ती जवळे , रविंद्र हसरगुंडे, विनोद मीँचे , सुनील सुतार, शैख अझरुद्दीन, शंकर बोईनवाड, अरविंद पत्की, श्रीकृष्ण चव्हाण, मनोहर लोहारे, रोशन मुल्ला आदी च्या सह्या आहेत