पत्रकार भवन आश्वासन हवेत, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या कार्यालया समोर पत्रकाराचे उपोषण सुरू
उदगीर :- येथील पत्रकारांना पत्रकार भवन च्या जागे साठी एक वेळेस नाही तर अनेक वेळा आश्वासन देऊन त्याची पूर्तता न झाल्याने आज सर्व पत्रकारानी राज्यमंत्री बनसोडे यांच्या कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे
उदगीर येथे पत्रकार भवन व्हावे म्हणुन पत्रकारांनी अनेक आंदोलने केली, नपा ने जागा घोषित केली पण ती काही दिली नाही म्हणुन जानेवारी महिन्यात पत्रकारानी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले होते त्या वेळेस राज्यमंत्री संजय बनसोडे स्वतः येऊन एक महिन्यात जागेचा प्रश्न सोडवतो म्हणुन पत्रकाराच्या उपोषनाची सांगता केली खरी पण 8 महिने होऊन ही हा प्रश्न सुटला नसल्याने आज गुरुवार 13/8/2020 रोजी सकाळी 11 पासून येथील सर्व पत्रकार राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नपा संकुल कार्यालया समोर ऐन पावसात उपोषणाला बसले असून आता ही लढाई आर पार ची असून पत्रकार भवन जागेचा प्रश्न मिटल्या शिवाय येथुन उठणार नाही असे पत्रकाराचे म्हणणे आहे, आता राज्यमंत्री काय निर्णय घेणार हे पहावे लागेल