:- काही डॉ. वीडियो कॉन्फरन्स वरुण रुग्णाच्या समस्यां जाणुन घेण्यासाठी 400 रुपये अकारत असताना माणुसकीचे भान ठेऊन अविरत रुग्ण सेवा देणारा एकमेव डॉक्टर
उदगीर :- कोरोंना काळात रुग्णांना अनेक डॉक्टर दुरूनच पाहून इलाज करीत असताना, डॉ अनुप चिकमुर्गे हे रुग्णाला दिलासा देऊन आत्मियतेने विचारपूस करून इलाज करत असल्याने त्यांनी दवाखान्याचे नाव 'अमृत' ठेवले असून, या काळात रुग्णांसाठी हा दवाखाना एक अमृत म्हणुन सिद्ध झाल्याचे दिसून येते आहे
उदगीर व परिसरातील रुग्ण काहीही झाले की सध्या घाबरून कुठे कोरोंना तर नाही ना या भीतीनेच अर्धे खचून जात आहेत यात काही डॉक्टर हे रुग्णास हाथ भर लांब ठेवूनच इलाज करत आहेत, या काळात रुग्ण घाबरून जाऊ नये म्हणून डॉक्टरांनी त्यांना धीर दिला तर रुग्णाची अर्धी बीमारी कमी होते हेच जाणुन अमृत हॉस्पिटल चे डॉ. अनुप चिकमुर्गे यांनी अविरत रुग्ण सेवा सुरू ठेवली असून ते रुग्णांसाठी देवदूत ठरले असून त्यांनी दवाखान्याचे नाव अमृत ठेवले असून हा दवाखाना यशवंत सोसायटी, दूधिया हनुमान मंदिरा समोर असून , या काळात रुग्णास हा दवाखाना अमृता पेक्षा ही जास्त वाटत असून डॉक्टर व त्याचे सहकारी जे परिश्रम घेत आहेत ते खरेच वाखाणण्याजोगी आहे.