:-उदगीर मध्ये रामभक्तानी फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा
:-हनुमान गढ़ी येथे श्री हनुमानजी चे दर्शन घेऊन पंतप्रधान श्री रामलल्ला ला साष्टांग दंडवत घालत घेतले श्री रामलल्ला चे दर्शन पश्च्यात 12 वाजून 44 मिनिट 8 सेकंड शुभ मुहूर्तावर भूमिपूजन संपन्न
उदगीर :- सकल विश्वा चे श्रद्धां स्थान, भारतीयांचे अराध्य दैवत प्रभू श्री राम यांच्या जन्मभूमि अयोध्या येथे आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मंदिराचे भूमिपूजन मोठ्या थाटात वेद मंत्रांच्या जयघोषात 12 वाजून 44 मिनिट 8 सेकंड या शुभ मुहूर्तावर 9 शिळा चे पूजन करून संपन्न झाले
आज चा दिवस प्रभू श्री राम भक्ता च्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा राहिला, आज अयोध्या येथे प्रभु श्री रामजी यांच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 वाजुन 44 मिनिट 8 सेकंड या शुभ मुहूर्तावर संपन्न झाले, श्री राम मंदिर निर्माण साठी अयोध्या येथे 2 लाख 75 हजार शीला राम भक्तानी पाठवल्या होत्या त्या पैकी 9 शीला चे पूजन करून भूमिपूजन करण्यात आले या वेळेस उत्तर प्रदेश राज्यपाल आनंदीबेन पटेल, आर एस एस प्रमुख मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोबत मंदिर ट्रस्ट पदाधिकारी व अनेक साधू संत उपस्थित होते, पुढील तीन वर्षात येथे भव्य दिव्य मंदिर निर्माण होऊन त्यात श्री रामलल्ला विराजमान होतील, आज चा दिवस रामभक्ता च्या जीवणातील अविस्मरणीय क्षण राहिला तर उदगीर येथील या क्षणी फटाके फोडून रामभक्तानी आनंदोत्सव ही साजरा केला