मंत्री महोदयाचाच एक्स रे खराब, अधिकार्यांनी केला खुलासा
उदगीर :- उदगीर उपजिल्हा रुग्णालयात आज राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते एक्स रे मशीन व अन्य मशीन चा शुभारंभ केला खरा पण स्वतः मंत्री महोदयानी स्वतःचा एक्स रे काढलं असता तो खराब निघाल्याने अधिकार्यांनी त्यांना बैठकीत सत्यता सांगीतली
आज राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयातील एक्स रे व अन्य मशीन चा शुभारंभ करण्यात आला या वेळेस मंत्री महोदयानी स्वतःचा एक्स रे काढला असता तो खराब निघाल्याने मंत्री महोदयानी बैठकीत उपस्थित अधिकार्यांना प्रश्न करताच डॉ हरिदास यांनी सांगितले की एक्स रे मशीन जुनी आहे फक्त प्रोसेसर नवीन असल्याने असे आले आहे, उद्घाटनप्रसंगी जर या एक्स रे मशीन ची ही अवस्था असेल तर पुढे काय होईल हे देवालाच माहित, या बैठकीत मंत्री महोदयानी उपजिल्हा रुग्णालयात योग्य सुविधा पुरविण्यात याव्यात असे ही सांगितले, या बैठकीत सर्व विभागाच्या अधिकाऱ्या कडून माहिती घेऊन त्यांना विकासा बाबत त्वरित योजना राबवण्याच्या सुचना ही केल्या