कोरोना अणि माझा सरकारी दवाखान्यातील उपचार :- सुनील चिकटवार
उदगीर दिनांक22/10/2020 ला मी कोरोना ची टेस्ट केली व 23/10/2020 रात्री कळले की माझा रीपोर्ट कोरोना पोसिटीव्ह आहे माझ्या तोंडाचे पाणी पळाले, काय करावे ते कळेना निर्णय घेता येईना सरकारी का खाजगी? हाच प्रश्न समोर येत होता अखेर मला माझ्या बालपणीचा मित्र डॉ. संजय कुलकर्णी व सतिश क्षीरसागर हे माझ्या मदतीला धावून आले. कोरोनाचा काळ पण मित्रांची साथ हिच खरी कसोटी होती खऱ्या मित्रांची आस.
त्यांनी मला लागलीच सरकारी दवाखाना उदगीर येथे ऍडमिट होण्याचा सल्ला दिला, मी क्षणाचाही विचार न करता लागलीच होकार दिला व सरकारी दवाखान्यात ऍडमिट झालो . भीती होती आजार विचीत्र वळणावर आलेला व माझा उपचार होईल का ? पण निश्चय पक्का केला व ऍडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला लक्षात आले की मी एकदम सुरक्षीत हातात आलो . या काळात ज्यांना ज्यांना कळले की आमचे सर्व कुटुंब आम्ही 5 जण कोरोना पोसिटीव्ह आलोय अनेकांचे भरपूर फोन आले त्यांच्या शुभेच्छा माझ्या परिवारासाठी अत्यंत महत्वाच्या होत्या त्या मी नम्रपणे स्वीकारले.
मी सरकारीत दाखल झालो याचा मला बिलकुल गंध नव्हता कारण मला ईथल्या सर्व सरकारी यंत्रणा या खाजगी दवाखान्यात सेवा मिळतात त्या पेक्षा ही वरचढ दिल्या . विशेष सर्व डॉक्टर, नर्सिंग सेवा देणाऱ्या सर्व नर्स ,वॉर्डात स्वच्छतेचे काम करणारे वॉर्ड मुले,जेवण करा नाहीतर दुरुस्त होणार नाहीत अशी बोलणारी व जबरदस्तीने खाऊन घ्या अशी कंत्राटी वॉर्ड बॉय म्हणत तेंव्हा खरच वाटत की आपण सरकारी त ऍडमिट झालो? हा काळ फार वेगळा होता, मनात भीती होती पण समाजबांधव ( avopa) चे सर्व सन्माननीय सदस्य लागलीच माझ्या मदतीला धावून आले. आमचे बंधू दीपक राव,शेजारी मित्र राजू सोनी तसेच माझा बालमित्र डॉ किरण सोनवे परभणी यांनी माझ्यासाठी डॉ. ना फोनवर वेळोवेळी बोलले,डॉ, हरिदास सर ,डॉ डांगे सर,डॉ, देशपांडे सर,डॉ सत्तार सर,डॉ माने सर,डॉ चिकमुर्गे मॅम या सर्वानी इतकी चांगली मदत केली हे मी कधीही विसरू शकत नाही. तसेच या कामी रजनी तोंडारे , शेख शबनम,गायत्री कोरे,संदीप राठोड,रमेश राठोड,मुन्ना पवार,स्वामी,ई नि फार सहकार्य केले .कोरोनाचे खरे योद्धे हेच आहेत .
या सर्वांच्या जीवावर मी माझी आई,पत्नी मुलगा याना याच दवाखान्यात ऍडमिट केले आहे. इश्वेर त्यांना साथ देईल पण मला या सरकारी दवाखान्यातिल सर्व माझ्या बंधू वर विश्वास टाकला आहे तो त्यांनी या पुढे ही कायम टिकवतील व सामान्य माणसाला योग्य उपचार मिळतील हीच अपेक्षा
सुनील चिकटवार, उदगीर