आज कोरोंना चे उदगीर तालुक्यात 31 पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू
उदगीर :- आज बुधवार 15/9/2020 रोजी उदगीर तालुक्यात कोरोंना चे 31 नवीन रुग्ण आढळून आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयातून डॉ देशपांडे यांनी कळवले आहे
आज उपजिल्हा रुग्णालया कडून जो आवाहाल डॉ देशपांडे यांनी उदगीर समाचार ला दिला आहे त्यात आज कोरोंना चे नवीन 31 रुग्ण आढळून आल्याचे सांगितले असून यात आरटीपीसीआर टेस्ट मधून 12 तर एंटीजण टेस्ट मधुन 19 कोरोंना रुग्ण आढळून आले आहेत तर आज एका कोरोंना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे, वाढती रुग्ण संख्या घातक ठरू शकते तर उपजिल्हा रुग्णालयातील हलगर्जीपणा मुळे दोन दिवसा पुर्वी नपा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे कर्मचारी बोलून दाखवत असून या कडे प्रशासनाने त्वरित लक्ष नाही दिल्यास प्रशासनास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले असे दिसते