उदगीर कोरोंना हजारी पार, आज 41 पॉझिटीव्ह
उदगीर :- उदगीर तालुक्याने कोरोंना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आज हजारी पार गेली असून आज 41 रुग्ण पॉझिटीव्ह आल्याचे आवाहालात नमूद केले आहे
आज उपजिल्हा रुग्णालया कडून डॉ देशपांडे यांनी कोरोंना रुग्णाचा आवाहाल दिला असून आज 41 कोरोंना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत, आत्ता पर्यंत कोरोंना रुग्णाची संख्या ही हजारी पार करून 1011 वर पोहोचली असून या पैकी 496 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आता पर्यंत 40 रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर आज रोजी 178 रुग्णावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. आज जे 41 रुग्ण आढळून आले आहेत यात अॅण्टीजण टेस्ट मध्ये 27 तर आरटीपीसी टेस्ट मध्ये 14 रुग्ण आढळून आले आहेत. मागील तीन दिवसा पासुन रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे