81 वर्षीय आजीची कोरोंना वर मात
:-उदगीर येथील सौ. लता शेषेराव कुलकर्णी यांची कोरोंना वर मात
उदगीर :- येथील अँड सचिन कुलकर्णी व डॉ संजय कुलकर्णी यांच्या मातोश्री सौ. लता शेषराव कुलकर्णी यांनी कोरोंना वर मात केली आहे
येथील प्रसिद्ध विधितज्ञ शेषराव कुलकर्णी यांच्या पत्नी तथा अँड सचिन व डॉ संजय कुलकर्णी यांच्या मातोश्री सौ. लता कुलकर्णी यांनी 81 व्या वर्षी कोरोंना वर मात करून घरी परतल्या आहेत, त्यांना कोरोंना ची लागण होताच लातूर येथील लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते आज 19/9/2020 शनिवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून ते एकदम तंदुरुस्त होऊन घरी परतताच त्यांचे आरती करून व फुलाची उधळण करत त्यांचे घरी स्वागत करण्यात आले