एकीकडे कोरोंना तर दुसरीकडे चिकन गुनिया ने उदगीर कर त्रस्त!
:- चिकन गुनिया ने अनेक रुग्ण परेशान नपा झोपीत ? घरात एकाला की लागण झाली की अख्या कुटुंबास होत आहे चिकन गुनिया
उदगीर :- एकीकडे कोरोंना चा तर दुसरीकडे चिकन गुनिया होत असल्याने अनेक रुग्ण परेशान असून चिकन गुनिया रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाही नपा कुठलाच उपाय करत नसल्याने नपा झोपीत आहे की काय हा प्रश्न निर्माण होत आहे
उदगीर व ग्रामीण भागात एकीकडे कोरोंना महामारी ने हैदोस घातला असताना मागील एक महिन्यापासून शहर व ग्रामीण भागात चिकन गुनिया ने हैदोस घातल्याचे दिसत आहे, या चिकन गुनिया च्या रुग्णांना ताप येऊन सांधे दुखणे, सांधे अकडने अश्या प्रकारे चालू असून हा आजार एडीस एईजीप्ती डासां पासून होतो असे डॉक्टर कुमठेकर यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले असून हा आजार झाला तर रुग्णास पुढील सहा महिने सांधे दुखी चा त्रास सहन करावा लागेल असे ही डॉक्टरांचे म्हणणे आहे, स्वच्छतेचे पुरस्कार मिळउन नाव करून घेणारी नपा एवढे चिकन गुनिया चे रुग्ण सापडून ही कुठे च फवारणी किंवा उपाय योजना करताना दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, चिकन गुनिया होऊन ही रुग्ण कुठे कोरोंना झाला का म्हणुन घाबरून जात असल्याचे चित्र दिसत आहे.