कर्जमुक्ती योजना- 2019
पात्र लाभार्थींनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे
उदगीर :जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना-2019 जाहिर केली असून सदर योनजेची अंमलबजावणी चालू आहे. या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणे करीता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. लातूर (899), स्टेट बँक ऑफ इंडिया (382), बँक ऑफ महाराष्ट्र (201) महाराष्ट्र ग्रामीण बँक (166), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (139), अलाहाबाद बँक (42) बँक ऑफ इंडिया (34), शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे बाकी आहे.
संबंधीत लाभार्थ्यानी बँकेशी अथवा महा-ई-सेवा केंद्राशी संपर्क साधून आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे व या योजनेचा लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, लातूर व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी केले आहे.