उदगीर :- काल उदगीर समाचार मध्ये बातमी प्रसिद्ध होताच आज दि ९ ऑक्टोबर रोजी सकाळी हुतात्मा स्मारक उदगीर येथे घडलेल्या वृक्षतोड घटनेस्थळी कारवाँ फाऊंडेशन व पेडल टू गो च्या पर्यावरण प्रेमी व्यक्तींनी झालेल्या क्षतिग्रस्त वृक्षांना प्रथमोपचार करून जीवनदान देण्याचा प्रयत्न केला. काल सायंकाळी एका अज्ञात इसमाने तब्बल २५० वृक्ष तोडली.या घटनेचा काल या पर्यावरण प्रेमी लोकांनी एक वृक्ष लाऊन निषेध नोंदवला.येथेच न थांबता तातडीने या संघटनेने त्या सर्व क्षतिग्रस्त *वृक्षांना शेण,गोमूत्र चा लेप लावून मलमपट्टी केली व जीवदान देण्याचा प्रयत्न केला.* हे वृक्ष वाचतील की नाही हे निसर्गचं ठरवेल पण आपल्यातील संवेदना नक्कीच वाचेल असे प्रतिपादन कारवाँ फाउंडेशन कडून व्यक्त करण्यात आले.
प्रसंगी कारवाँ फाऊंडेशन, पेडल टू गो चे सहकारी व इतर पर्यावरण प्रेमी डॉ संजय कुलकर्णी,अदिती पाटील
मुरलीधर जाधव,पत्रकार रवी हसरगुंडे,अमोल घुमाडे,संदीप मद्दे,प्रेमा लोणी, करण रेड्डी,वैजिनाथ गांजुरे,संदीप आडके,चंद्रशेखर वट्टमवार,शुभम पाटील,श्रीकांत पारसेवार,शिवा उपरबावडे,सोलापूरे गिरीश, हर्ष भुतडा, ताहेर हुसेन, अदनान सय्यद,गुरुप्रसाद पांढरे
उपस्थित होते.