भ्रष्टाचाराची चौकशी व कार्यवाही होत नसल्याने जी. प. समोर उपोषण
:-:- सरपंच व ग्रामसेवकाची त्वरित चौकशी करून कार्यवाही ची मागणी.
उदगीर :- हंचनाळ ता. देवनी येथील सरपंच व ग्रामसेवकानी अनेक कामात लाखोंचा भ्रष्टाचार केला असून या बाबत अनेक तक्रारी देऊन ही कुठलीच कार्यवाही न झाल्याने भगवान बिरादार व मधुकर बिरादार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. प. लातूर याना निवेदन देऊन त्वरित कार्यवाही नाही झाल्यास जी. प. लातूर समोर उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले आहे
हंचनाळ ता. देवनी येथील ग्रामपंचायत मार्फत 14 व्या वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व इतर कामात लाखोंचा भ्रष्ट्राचार सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक यांनी देवनी येथील गट विकास अधिकारी व संबंधीत अभियंता यांच्याशी हाथ मिळवणी करून केली या बाबत अनेक तक्रारी पंचायत समिती देवनी येथे दिल्या पण काहीच न झाल्याने येथील ग्रामस्थ भगवान राजाराम बिरादार व मधुकर तानाजी बिरादार यांनी 21/10/2020 रोजी जी. प. मुख्य कार्यकारी अधिकारी याना एक निवेदन देऊन या भ्रष्टाचाराविरुद्ध त्वरित कार्यवाही करावी अन्यथा 23/11/2020 पासून जी.प .लातूर समोर उपोषण करण्यात येईल व काही कार्यवाही नाही झाल्यास हेच उपोषण विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यालया समोर करण्यात येईल असे नमूद केले आहे, जी. प. आता या भ्रष्टाचाराची काय चौकशी करते व काय कार्यवाही करते हे पहावे लागेल