रात्री दहाची उदगीर- हैदराबाद आंध्रा बस चालू होणार
उदगीर :-उदगीर येथुन हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या त्यातच सीमाभागातील व्यापाऱ्यांची व प्रवाशांची संख्याही खुप आहे. अनेकांची कामे हैदराबादला असतात त्यामुळे या रात्री दहाला निघून पहाटे चारला पोहोचणारी उदगीर हैदराबाद हि आंध्र गाडी सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची होती परंतु कोरोणाच्या कारणांनी ही गाडी बंद केली होती.
अनेकांनी सातत्याने प्रशासनाला लेखी निवेदने देऊन फोन करुन पाठपुरावा केला याची दखल व येणारा दिवाळीचा सण आणि प्रवाशांची होणारी अडचण सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने हैद्राबाद आगार प्रमुख राजेंद्र रेड्डी यांनी ही गाडी पुन्हा चालू करण्याचे ठरवले असून उद्या शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर २०२० पासून ही गाडी नियमितपणे चालू होणार आहे. उदगीर येथून ही गाडी संध्याकाळी ठीक दहा ला निघेल आणि हैदराबादला पहाटे साडेचारला पोहोचेल. तर ती परत दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकराला हैदराबाद येथून निघून संध्याकाळी उदगीर ला पोहचणार आहे. तेव्हा या गाडीचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.