भटक्या कुत्र्यां मुळे उदगीरकर परेशान
:- उमा चौक, पोलिस स्टेशन समोर, रेल्वे स्टेशन रोड, हावगीस्वामी कॉलेज रोड वर कुत्र्याचा धुमाकूळ, वाहण चालक परेशान
उदगीर :- उदगीर येथील अनेक ठिकाणी कुत्र्याचे टोळके रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकाच्या अंगावर धावून येत आहेत तर हे कुत्रे अनेक ठिकाणी लहान मुलांना चावा ही घेतला असताना नपा गप्प असून या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा असी मागणी नागरिक करीत आहेत
उदगीर येथील उमा चौकात अनेक मटणाचे दुकाने आहेत मोकाट कुत्री येथे दिवस रात्र पडून रहातात, संध्याकाळी तर हे कुत्रे वाहण चालकाच्या सरळ अंगावरच येतात असाच प्रकार आंबेडकर चौक ते रेल्वे स्टेशन रोड वर, पुलिस स्टेशन समोर घडत आहेत, मागील काही दिवसां पूर्वी रेल्वे स्टेशन रोड वर पाच वर्षीय लहान मुलाचा कुत्र्यांनी चावा घेतला, असाच प्रकार अनेक ठिकाणी घडून ही नगर परिषद या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त का करत नाही हा प्रश्न सगळ्याना पडत असून नगर परिषद ने त्वरित या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असी मागणी नागरिक करत आहेत.