अनेकांचे धाबे दणाणले, जययूक्त शिवार कामांची शासन चौकशी करणार
:- उदगीर तालुक्यात बोगस कामे करणार्या अधिकाऱ्याची व एजेंसी ची उडाली झोप?
उदगीर :-. राज्यात मागील सरकारने जलयुक्त शिवार कामावर 9 हजार कोटी रुपया पेक्षा जास्त खर्च केला होता पण कॅग ने या कामावर अनेक ताशेरे ओढले होते तर या योजने च्या अनेक तक्रारी आल्याने शासनाने मागील जलयुक्त कामाची चौकशी चे आदेश दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले असल्याचे दिसत आहे
राज्यात मागील युती सरकारने जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणात राबविले होते, या कामावर 9 हजार कोटी रुपयां पेक्षा जास्त रक्कम खर्च ही करण्यात आली आहे, अनेक ठिकाणाहून या कामाबद्दल अनेक तक्रारी ही शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत तर कॅग ने ही या योजने वर ताशेरे ओढले आहेत हे पाहून शासनाने या योजने अंतर्गत झालेल्या कामांच्या चौकशी चे आदेश आज दिले असून, ज्यानी ज्यानी या योजने अंतर्गत बोगस कामे केली आहेत त्यांचे या चौकशी ने पितळ उघडे पडणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणल्याचे दिसत आहे