उदगीरच्या सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल श्रीमती पी. एम. सुर्यवंशी निलंबित
उदगीर--येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वनक्षेत्रपाल श्रीमती पी. एम. सुर्यवंशी यांना अपहार व कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे.
उदगीर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वनक्षेत्रपाल श्रीमती पी. एम. सूर्यवंशी यांनी क्षेत्रीय कामे मंजूर अंदाजपत्रकापेक्षा कमी करून 56 लाख,36 हजार 912 रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार करून मंजूर क्षेत्रीय कामे संबंधित वनपाल व वनरक्षक यांच्या मार्फत न करता याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना न देणे.याशिवाय शासनाने नेमून दिलेली कामे वेळेवर न करता उदासिनता व कामचुकारपणा करून कर्तव्याची घोर उपेक्षा करणे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे व आदेशाचे पालन न करणे या कारणावरून वनक्षेत्रपाल श्रीमती सूर्यवंशी यांना औरंगाबादच्या सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक एस. बी. फुले यांनी 28 सप्टेंबर रोजी निलंबित केले आहे.