उद्या पासून हैदराबाद औरंगाबाद विशेष रेल्वे धावणार..... सणासुदीला विशेष गाडी : उदगीर :- रेल्वे प्रशासनाने हैदराबाद ते औरंगाबाद व्हाया उदगीर विशेष रेल्वे उद्या पासून सूरु केली आहे. दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी एक माहिती पत्रक काढून ही विशेष रेल्वे गाडी क्र 07049/050 शुक्रवारी (आजपासून) सुरू करणार असल्याचे कळविले. या गाडीमुळे हैदराबाद, बेगमपेठ, विकाराबाद, जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, कुमठा, अंबिका रोहिना, नागेशवाडी, लातूर रोड, वडवळ, कारेपुर, मूर्ती, परळी, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, रांजनी, जालना,बदनापूर, मुकुंदवाडी व औरंगाबाद ही स्थानक जोडली जाणार असून सणासुदीला प्रवाश्यांना याचा लाभ होणार आहे. हैदराबाद ते औरंगाबाद 23 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर तर औरंगाबाद ते हैदराबाद 24 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही गाडी दररोज धावणार आहे. या साठी रेल्वे संघर्ष समिती चा पाठपुरावा तसेच अनेक वृत्तपत्रातून आलेल्या बातम्यांची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली,
येणाऱ्या सणासुदी चा विचार करून प्रवाशांच्या सुविधे करिता दक्षिण मध्य रेल्वे दिनांक २० ऑक्टोबर पासून तीन फेस्टिवल विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.
तसेच उद्या दिनांक २३ ऑक्टोबर पासून आणखी पाच उत्सव विशेष गाड्या सुरु करण्यात येत आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत . या चारही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत . अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे असतील --
क्र. गाडी संख्या कुठून कुठे वेळ दिनांक
1) . ०७६१४ नांदेड पनवेल १७.३० वाजता २३.१०.२०२० ते २९.११.२०२०
2 ) ०७६१३ पनवेल नांदेड १६.०० वाजता २४.१०.२०२० ते
३०.११.२०२०
3.) ०७६८८ धर्माबाद मनमाड ०४.०० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२०
4 ) ०७६८७ मनमाड धर्माबाद १५.०० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२०
`5) ०७६३९ दर सोमवारी काचीगुडा अकोला ०७.१० वाजता २६.१०.२०२० ते २३.११.२०२०
6) ०७६४० दर मंगळवारी अकोला काचीगुडा ०९.३० वाजता २७.१०.२०२० ते
२४.११.२०२०
७) ०७६४१
(आठ्वड्यातुन सहा दिवस ) काचीगुडा नारख़ेड ०७.१० वाजता २३.१०.२०२० ते २९.११.२०२०
८) ०७६४२ (आठ्वड्यातुन सहा दिवस ) नारख़ेड काचीगुडा ०४.३० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२०
९) ०७०४९ मार्गे परळी हैदराबाद औरंगाबाद २२.४५ वाजता २३.१०.२०२० ते २९.११.२०२०
१०) ०७०५० मार्गे परळी औरंगाबाद हैदराबाद 16.15 वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२०
या पाच उत्सव विशेष गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहेत.