अज्ञाता कडून हुतात्मा स्मारक गार्डन मधील झाडाची नासधूस
:- भारत राठोड (नपा मुख्याधिकारी ) नगर पालिकेने या झाडांना लहान मुलां सारखं जपले असून ज्यानी हा प्रकार केला आहे त्याचे नाव ज्याना माहीत असेल त्यांनी सांगावे त्यांचे नाव गुप्त ठेऊन त्यांना योग्य बक्षीसही देण्यात येईल
उदगीर :- उदगीर येथील हुतात्मा स्मारक परिसरातील गार्डन मध्ये नगर परिषदेने मियावाकी पद्धतिने अनेक झाडे दोन वर्षा पुर्वी लागवड केली होती त्या पैकी अज्ञाताने रात्री 300 झाडाची नासधूस केली आहे
येथील हुतात्मा स्मारक परिसरात दोन वर्षा पुर्वी नगरपरिषद ने मियावाकी पद्धतीने अनेक झाडे लावली आहेत, या वर्षीच्या पावसाने ही झाडे बहरली होती पण काल रात्री कोणीतरी अज्ञाताने या परिसरातील 250 ते 300 झाडाची नासधूस केली असून हे दृश्य मन हेलावून टाकणारे आहे, अश्या मनोवृति च्यावर त्वरित गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी वृक्ष प्रेमी करत आहेत तर नगर पालिके तर्फे लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल असी माहिती मुख्याधिकारी भारत राठोड यांनी उदगीर समाचार ला बोलताना दिली