काही पॅसेंजर रेल्वे एक्सप्रेस म्हणुन धावणार, रेल्वेबोर्डाचा निर्णय
उदगीर ः रेल्वे बोर्डाने काही पॅसेंजर रेल्वेगाड्यांना सणासुदीच्या काळात एक्स्प्रेस गाड्या म्हणून चालविण्याची मान्यता दिली आहे.
रेल्वेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांनी काही रेल्वेगाड्यांच्या दर्जामध्ये सद्यस्थितीत बदल करण्यासंदर्भात शिफारस केली होती. त्यानुसार पॅसेंजर ट्रेनला एक्स्प्रेसचा दर्जा देण्यास रेल्वे बोर्डाने मान्यता दिली आहे.मराठवाड्यातून जाणाऱ्या काही गाड्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे
*पुणे - निजामाबाद- पुणे (51421/22)*
*निजामाबाद - पंढरपूर - निजामाबाद (51433/34)*
*दौंड - नांदेड - दौंड (57515/16) हैदराबाद - पूर्णा - हैदराबाद (57547/48)*
*हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद (57549/50)*
*काचिगुडा - नगरसोल - काचिगुडा (57561/62)*
*हैदराबाद - परभणी - हैदराबाद (57563/64)*
*अकोला - पूर्णा - अकोला (57583/84)*
*मिरज - परळी - मिरज (51425/26)*
या गाड्यांचा समावेश आहे.या गाड्यांचे काही स्टॉप उत्पन्नाचे आधारे कमी होऊन सदरील गाड्यांचा वेग वाढविला जाईल या सर्व गाड्या लवकरच सुरू होतील*