- कारची काच फोडून 10 लाख 58 हजार रुपये पळविले
- :- उदगीर येथील बैनामा कार्यालया समोरील घटना
:- आरोपी सी सी टी वी मध्ये कैद
उदगीर :- उदगीर येथील सहायक दुय्यम निबंधक (बैनामा) वर्ग 2 कार्यकालया समोर प्लाट विक्रीतून 10 लाख 58 हजार रुपये आलेली रक्कम कार मध्ये ठेवली असता अज्ञात ने कार ची काच फोडून ती रक्कम पळवल्याणे शहर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
सावळी (संगम ) कर्नाटक येथील दिलीप मुदाळे यांनी आज बुधवारी तीन प्लाट विकून 10 लाख 58 हजार आलेले आपल्या कार क्र. के. ए.25 झेड 6686 मध्ये ठेऊन परत रजिस्ट्री कार्यालयात गेले होते थोड्या वेळाने येऊन पाहिले असता गाडी ची काच फोडून अज्ञाताने गाड़ी मधील रक्कम लंपास केल्याचे समजताच त्यांनी त्वरित शहर पोलीस ठाण्यात कळविले असता पोलिस व अधिकारी येऊन त्वरित आजू बाजू च्या सी सी टी वी फुटेज पहाणी केली असता दोन आरोपी सी सी टी वी मध्ये मोटर साइकिल वरुण आल्याचे दिसत असून त्या वर ते चौकशी करत असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे समजते