उदगीर बस स्टँडगेट वरील अंधार त्वरित दूर करा :- सौ. उषाकिरण बिरादार
उदगीर :- उदगीर बस स्टँड वरुण रात्री व पहाटे अनेक प्रवासी ये जा करतात पण मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असल्याने जेष्ठ नागरिकाना, महिलाना, लहान मुलांना जीव मुठीत धरून जावे लागत असून ही समस्या त्वरित सोडवावी असी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सौ. उषाकिरण बिरादार यांनी केली आहे
उदगीर बस स्टँड वरुण दर रोज हजारो प्रवासी प्रवास करतात, पहाटे पहाटे अनेक शेतकरी हे पाहिल्या दिवसी माल विकून बस ने जातात पण बस स्टँड च्या मुख्य प्रवेशद्वारावर लाइट ची कुठलीच सोय केली नसल्याने अंधार असून या वेळेस जेष्ठ नागरिक, महिला लहान मुले ही प्रवास करण्या साठी बस स्टँड वर येतात पण प्रवेश द्वारावर अंधार असल्याने अनेकांना भीती वाटते म्हणुन महामंडळाच्या अधिकार्यांनी त्वरित लक्ष देऊन येथे लाइट ची सोय करावी अन्यथा महिलाना अधिकार्यांना धडा शिकवावा लागेल असे येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. उषाकिरण बिरादार यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले आहे