फार्म हाऊस वर दरोडा, 4 लाख 50 हजाराचे दागिने लुटले
:- बनशेळकी डैम वरील जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूची घटना
उदगीर :- उदगीर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या बनशेळकी डैम वरील जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूस राहणारे सुभाष नेत्रगावकर (78)यांच्या फार्म हाऊस वर गुरुवारी सायंकाळी 7 च्या सुमारास अज्ञात 2 बुरखा धारी चोरटय़ांनी चाकूचा धाक दाखवून 9 तोळे सोन्याचे दागिने लूटल्याने शहरात परत एकदा दहशत निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे
या बाबत ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की उदगीर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या बनशेळकी डैम वरील जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूस सुभाष नेत्रगावकर (78) हे आपल्या पत्नी सोबत येथील फार्म हाऊस वर राहतात, गुरुवार 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात च्या सुमारास दोन अज्ञात चोरटय़ांनी बुरखा घालून फार्म हाऊस मधील घरात प्रवेश केला अणि सुभाष यांच्या गळ्याशी चाकू लाऊन पत्नी च्या अंगावरील 4 तोळ्यांचे गंठण ज्याची किंमत दोन लाख व हातातील 5 तोळ्याच्या पाटल्या कीमत दोन लाख पन्नास हजार रुपये अश्या एकूण 9 तोळे किम्मत 4 लाख 50 हजार रुपयाची लूट करून चोरटे पसार झाले, ग्रामीण पोलीस ठाण्यात सुभाष नेत्रगावकर यांच्या फिर्यादी वरुण गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सिंगनकर हे अधिक तपास करीत आहेत, तर ही घटना समजताच अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव हे उदगीर येथे तळ ठोकून आहेत, आज शुक्रवार सकाळी 9-30 वाजता लातूर येथुन श्वानपथक दाखल झाले असून ते चोरटय़ांच्या मागावर आहेत, दोन दिवसात दोन घटना घडल्याने शहर व परिसरात घबराटीचे वातावरणात निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे