शर्मा गेले, चव्हाण आले, तेही गेले, उबाळे आले, वाहतुक कोंडी ने उदगीर कर त्रस्त
उदगीर :- उदगीर येथील दोन पोलीस निरीक्षक बदलून गेले तरी येथील वाहतुक व्यवस्था व अतिक्रमण काही केल्या सुधरत नसल्याने उदगीर कर त्रस्त आहेत
लातूर येथील नवीन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे येथील वाहतुक समस्या जाणून घेण्यासाठी मोटार सायकल वरुण फिरले तेंव्हा उदगीर कराना वाटत होते की येथील वाहतुक व्यवस्था सुधारेल, रस्त्यावरील अतिक्रमणे उठतील पण उदगीर कराची अशा ही हवेतच विराल्याचे चित्र दिसत आहे कारण मुख्य रस्ता सा. बा. विभागाचा रस्तावर अतिक्रमण दुसर्याचे व पैसे उकळत आहेत तिसरेच असा प्रकार बस स्टँड , उद्योग भवन समोर, देगलुर रोड, उमा चौकात सुरू आहे, पण येणारा अधिकारी मूग गिळून का गप्प राहतात हे न समझ न्या इतके उदगीर कर वेडे नाहीत, अनेकानी तर भर रस्त्यावर अतिक्रमण केले आहे, ऑटो रिक्षा चालक भर रस्त्यावर ऑटो उभे करत आहेत, हाथ गाडी वाले रस्त्यावर दुकानदारि करत असून, लाखो रुपये भाडे देऊन दुकानदार परेशान आहेत, त्यांच्या समोर थांबून हे मस्त दिसत आहेत, भर रस्त्यावर उभे असल्याने पोलीस गाडी आली की ते गाडय़ा हलवल्या सारखे करतात अणि गाडी गेली की परत भर रस्त्यावर येतात, याना पोलिस व नगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाराचा याना धाक दिसत नसल्याने पायी चालत जाणारे नागरिक, महिला लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे