उदगीर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ओळख पत्राचे वाटप
:- लातूर जिल्ह्यातील ओळख पत्र देणारा एकमेव तालुका पत्रकार संघ
उदगीर :- उदगीर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज दिवाळी च्या शुभ मुहूर्तावर तालुका मराठी पत्रकार संघाच्या सदस्याना संघाचे ओळख पत्र वाटप करण्यात आले, संघाचे ओळख पत्र देणारे लातूर जिल्ह्यातील हा एकमेव पत्रकार संघ आहे
लातूर जिल्ह्यातील पत्रकार संघाने ओळख पत्र देणार म्हणुन अनेकदा घोषणा केली खरी पण अद्याप कोणत्याही संघाने पत्रकारांना ओळख पत्र दिले नाही पण उदगीर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सदस्य नोंदणी करून घेते वेळेस पत्रकार संघाच्या सदस्याना ओळख पत्र देणार ही घोषणा करून त्या घोषणेची पूर्तता आज दिवाळी च्या शुभ मुहूर्तावर लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सहसचिव श्रीनिवास सोनी यांच्या हस्ते ओळख पत्र वितरण करण्यात आले, हे ओळख पत्र बनवण्यासाठी संघाचे सचिव सचिन शिवशेटे यांनी विशेष परिश्रम घेतले या वेळेस लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य सुनील हवा सोबत बिभीषण मद्देवाड, सिद्धार्थ सुर्यवंशी, अर्जुन जाधव, अशोक कांबळे, अंबादास आलमखाणे, श्रीकृष्ण चव्हाण, इरफान शैख, बसवेश्वर ड़ावळे, माधव रोडगे, संगम पटवारी, सुनील सुतार, शैख अझरुद्दीन, सुधाकर नाईक, जावेद शेख, अनिल जाधव, राम जाधव, शंकर बोइनवाड, विश्वनाथ गायकवाड सोबत अनेक पत्रकार उपस्थित होते