राज्यातील धार्मिक स्थळे सोमवार पासून खुली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे :-राज्य सरकारने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सर्वधर्मींयांसाठी सर्वात मोठी बातमी दिली आहे. जनतेच्या भावना लक्षात घेऊन सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उदगीर : राज्यातील धार्मिक स्थळांचे दरवाजे अखेर खुले होणार आहेत. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
राज्यातील जनतेने कोरोंना काळात शिस्तीचे पालन केले त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच', असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे सुरू करण्याची घोषणा करताना नमूद केले आहे.