हंचनाळ ग्रा. प. भ्रष्टाचार चौकशी साठी जी. प. समोर सोमवार पासून उपोषण, उपोषण कर्त्याचे गंभीर आरोप
:- देवणी येथील गटविकास अधिकारी राऊत व ग्रामसेवक कैलवाडे याना निलंबित करून त्यांच्या मालमत्ते ची चौकशी करा:- भगवानराव बिरादार, मधुकर बिरादार
उपोषण कर्त्या चेआरोप हंचनाळ ग्रा. प. भ्रष्टाचार चौकशी साठी जी. प. समोर सोमवार पासून उपोषण, उपोषण कर्त्याचे गंभीर आरोप
:- बोगस बिले दुसर्याचे सादर करून चेकने पैसे उचलणारा. दुसरा तो कोण?
:- तत्कालीन ग्रामसेवक यांनी दप्तर गायब कशामुळे केले?
:- दलित वस्ती सुधार योजनेचे लाभार्थी कोण?
:- शोष खड्डे किती, दाखवले किती?
:- ग्रा. प. चा एक रुपया ही डायरेक्ट खर्च करता येत नसताना कोणाच्या आदेशाने डायरेक्ट केले खर्च :-
:- हा भ्रष्टाचार दडपण्याचा गटविकास अधिकारी व ग्रामसेवचा प्रयत्न त्यांच्या अंगलट येणार? किंवा भ्रस्टाचार करणार्या अभय मिळणार हे पहावे लागेल
उदगीर :- हंचनाळ ता देवनी येथील ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्या सहित देऊन ही जी. प. चे काही व गटविकास अधिकारी हे भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी व भ्रष्टाचार करणार्या पाठीशी घालत असून यांच्या वर कार्यवाही करावी म्हणुन निवेदन देऊन ही कुठलीच कारवाई न झाल्याने येथील ग्रामस्थ भगवान बिरादार व मधुकर बिरादार हे सोमवार 23/11 /2020 पासून मुख्याधिकारी जी. प. यांच्या कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले आहे
हंचनाळ येथील ग्रामपंचायत मध्ये मागील अनेक वर्षांपासून दलित वस्ती सुधार योजना कामे केली आहेत ती बोगस आहेत, एक काम दोन दोन वेळे दाखवून बिले उचलली, ग्रामपंचायत मध्ये बिल एकाचे आहे तर बिलाची रक्कम ही दुसर्याने चेक लाऊन उचलून घेतली, गावत शोषखड्डे केले किती अणि दाखवले किती, तर ग्रामपंचायत ला आलेली रक्कम खात्यात जमा न करता परस्पर खर्च कोणाच्या संगनमताने केली हे सर्व प्रकार लेखी देऊन ही गटविकास अधिकारी हे ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्याने आम्ही सोमवार 23/11 /2020 पासून जी. प. लातूर समोर कार्यालयीन वेळेत उपोषण करणार असल्याचे उदगीर समाचार ला उपोषण कर्ते भगवान राजाराम बिरादार व मधुकर तानाजी बिरादार यांनी सांगितले असून, प्रशासन उपोषण कर्ते उपोषणास बसल्या नंतरच काही कार्यवाही करणार का भ्रष्टाचार करणाऱ्यास अभय देणार हे पहावे लागेल ल