सावधान :- उदगीर परीसरात कोरोंना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ
उदगीर :- उदगीर येथे मागील काही दिवसांपासून कोरोंना रुग्णाची संख्या कमी झाली होती पण आज परत रुग्ण संख्या वाढ झाल्याने उदगीर करांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसून येते आहे
उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून जाहीर करण्यात आलेल्या कोरोंना रुग्ण संख्या ही अनेक दिवसा पासुन कमी झाली होती पण आज अचानक या रुग्ण संख्येत वाढ झाली असून आज 13 रुग्ण आढळून आल्याचे डॉ देशपांडे यांनी दिलेल्या आवाहालात दिसून येत आहे, आज आर टी सी पी टी तपासणीत 2 तर अंटीजन तपासणीत 11 रुग्ण आढळून आल्याचे सांगितले आहे, आज जी रुग्ण संख्या वाढ झाली आहे या मुळे उदगीर करानी सावधान राहणे जरूरी दिसत आहे अन्यथा पुढील दिवसात परत कोरोंना आपला प्रभाव नक्की दाखवेल असे वाटते