अरविंद पाटील एकंबेकर स्वयंघोषित अध्यक्ष :- विजयकुमार पाटील :- जो व्यक्ति संस्थेचा साधा सदस्य नाही ते घरी बसुन अध्यक्ष झाले उदगीर :-येथील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणुन अरविंद पाटील एकंबेकर यांनी काही दिवसांपूर्वी घोषित केले होते ते अध्यक्ष नसून मीच अध्यक्ष असल्याचे विजयकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष पदी मागील काळात विजयकुमार पाटील यांची निवड झाली होती, या संस्थे चे 15 कार्यकारिणी सदस्य असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे तर 13 सदस्य हयात आहेत त्या पैकी 9 सदस्याना आमिष दाखवून अरविंद पाटील एकंबेकर यांनी अध्यक्ष पदाचा दावा धर्मादाय आयुक्तांकडे केला होता, त्यास आम्ही कायदेशीर आक्षेप घेतला असून जे अरविंद पाटील एकंबेकर या संस्थेचे साधे सदस्य नाहीत त्यांनी स्वयं घोषित अध्यक्ष म्हणुन चौका चौकात बॅनर लाऊन मिरवत आहेत हे सर्व धादांत खोटे असून या संस्थेचा मीच खरा अध्यक्ष असून सचिव ज्ञानदेव झोडगे हे सचिव असून अरविंद पाटील एकंबेकर हे बेकायदेशीर अध्यक्ष म्हणुन मिरवत असून या खोट्या अफवा पसरविणाऱ्या पासून सावध रहावे कोणीही या वर विश्वास ठेवू नये असे शनिवारी संस्थेच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विजयकुमार पाटील व सचिव ज्ञानदेव झोडगे यांनी सांगितले आहे आता अरविंद पाटील आपली भूमिका काय मांडतात हे पहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी