सोमनाथपूर येथील ग्रामसेवकाची बदली रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन, उदगीर :- सोमनाथपूर ता. उदगीर येथील ग्रामसेवक साळुंके याची बदली त्वरित रद्द करावी अन्यथा आम्हास तीव्र आंदोलन करावे लागेल असे निवेदन अनेकांच्या सह्याने जी. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व इतराना दिले असून आता प्रशासन काय भूमिका घेते हे पहावे लागेल सोमनाथपूर येथील ग्रामसेवक साळुंके यांची बदली ही जाणून बुजून केली असून ही बदली त्वरित रद्द करण्यात यावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असे निवेदन जी. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी उदगीर याना दिले असून या निवेदनावर सोमनाथपूर येथील वैजनाथअप्पा तोंडारे, मारोती पवार, सूर्यप्रकाश डांगे,शिवाजी चव्हाण, मानसिंग पवार, लक्ष्मन आडे, श्याम कुमार विजापूरे, शिवराज तोंडारे, अरुणा स्वामी, संजय स्वामी सोबत 67 ग्रामस्थांच्या सह्या आहेत, आता प्रशासन काय भूमिका घेते हे पहावे लागेल