कोवीशील्ड लशीचे जिल्ह्यातील आठ केंद्रातून लसीकरण:- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ लक्ष्मण देशमुख :- लातूर जिल्ह्याला मिळाली 21040 लस :- पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रावरील 100 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना देणार लस उदगीर :- येणार येणार म्हणुन प्रतीक्षित कोरोंना लस कोविशील्ड च्या 21040 लशीचे आज लातूर येथे आगमन झाले असून 16 जानेवारी शनिवारी या लशीचा पहिला डोस देण्यात येणार आहे कोरोंना बीमारी साठी उपयुक्त असी सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया ची कोवीशील्ड लसीचे 21040 डोस आज लातूर येथे उपलब्ध झाले असून ते 68 शीतकरण केंद्रात साठवण केले असून 17824 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे, पहिला टप्पा शनिवारी 16 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रातून 100 अश्या आठ केंद्रातून आरोग्य अधिकारी, कर्मचारी याना ही लस देण्यात येणार असून यात विलासराव देशमुख शा. वै. महाविद्यालय, एम आय टी वै. महाविद्यालय, विवेकानंद हॉस्पिटल लातूर, उपजिल्हा रुग्णालय उदगीर, निलंगा, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर, मुरुड अणि औसा येथील केंद्रातून की लस देण्यात येणार असून, या साठी सर्व तयारी पूर्ण झाली असून केंद्रावर सुरक्षारक्षक, लस टोचणी अधिकारी, दोन वेवस्थापक, डॉक्टर व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ लक्ष्मण देशमुख यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
