अतिक्रमण मुक्त उदगीर साठी पत्रकाराचे तिरडी आंदोलन उदगीर :- उदगीर शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करून रहदारीस होणारी अडचण दूर करण्यासाठी आता पत्रकारानी कंबर कसली असून 7 जानेवारी गुरुवार रोजी पत्रकार तिरडी आंदोलन करणार असल्याचे निवेदन प्रशासनास दिले आहे उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावर एवढे अतिक्रमण वाढले आहे की सामान्य माणसाला चालणे अवघड झाले आहे, अनेकदा बातम्या देऊन ही काही होत नसल्याने पत्रकारानी तिरडी आंदोलन करतील असे निवेदन दिले होते काहीच न झाल्याने आता आंदोलनाचे हत्यार उपसले असून 7 जानेवारी गुरुवारी पत्रकार शहराच्या मुख्य रस्त्यावरून तिरडी आंदोलन काढणार असल्याचे निवेदन प्रशासनास दिले असून ही या बाबीवर प्रशासन मूग गिळून गप्प का बसले आहे हे समजत नाही
• श्रीनिवास मदनलाल सोनी