टाटा साठी एकजुटले पत्रकार, परिवारास दिली आर्थिक मदत :- आज दर्पण दिनी पत्रकारानी टाटा च्या कुटुंबास बनवले आत्मनिर्भर उदगीर :- उदगीर चे टाटा म्हणजे प्रेस फोटो ग्राफर श्री अशोक तोंडारे यांचे कुटुंब आर्थिक विवंचनेतून जात आहे हे पाहून त्या कुटुंबाला आत्मनिर्भर करण्यासाठी पत्रकार सरसावले व आज दर्पण दिनी त्या कुटुंबास सर्वानी मिळून ग्रँडर भेट दिली आज दर्पण दिन साजरा होत असताना उदगीर येथील प्रेस फोटो ग्राफर अशोक तोंडारे यांचा परिवार आर्थिक विवंचनेतुन जात आहे अणि त्या परिवाराचे जगणे अवघड झाल्याचे दिसून येत असताना त्यांना मदतीची आवश्यकता आहे ही बाब लक्षात घेऊन तेथील सर्व पत्रकार मिळून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आत्मनिर्भर बनवण्याचे ठरवून आर्थिक मदत जमा केली व त्या मधून त्या परिवारास रोज उत्पन्न होईल ही बाब जाणून त्यांना मसाला उद्योगा साठी ग्रँडर भेट देण्यात आली त्याचे पूजन जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांच्या हस्ते पूजन करून परिवाराकडे देण्यात आले या वेळेस सर्व पत्रकार उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी

