घर भरण्या साठी नाही गावाच्या विकासासाठी मतदान द्या :- आदर्श ग्राम विकास पैनल उदगीर :- हंचनाळ ता. देवनी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श ग्राम विकास पैनल आपले घर भरण्या साठी नसून आदर्श ग्रामपंचायत, आदर्श ग्राम करण्यासाठी असून ग्रामस्थांनी आम्हाला विकासासाठी मतदान द्यावे असी विनंती पैनल प्रमुख यानी केली आहे हंचनाळ ग्रामपंचायत मध्ये मागील काळात किती व कसा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सर्व उघडकीस आणले असून लवकरच मोठी कार्यवाही होईल यात शंका नाही, या निवडणुकीत आदर्श ग्राम विकास पैनल हे घर भरून घेण्यासाठी या निवडणुकीत उभे नसून आपल्या गावास आदर्श गाव, भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक कारभार करण्यासाठी उभे असून सर्वानी या निवडणुकीत आमच्या उमेदवारास भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी विनंती वार्ड एक चे मधुकर बिरादार, दर्याबाई बिरादार, कल्पना गिरी वार्ड दोन चे कल्पना बिरादार, बाबुराव म्हेत्रे अणि वार्ड तीन चे छाया कांबळे अणि राजेंद्र सुर्यवंशी यांनी केले असून, गावातील जनतेचा वाढता प्रतिसाद पहाता विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र सध्या गावात दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
