आदर्श ग्राम विकास पैनल च्या प्रचार शुभारंभाने विरोधकांचे धाबे दणाणले :- भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, आदर्श ग्राम संकल्पना घेऊन विकास पैनल निवडणूक रिंगणात उदगीर :- हंचनाळ ता. देवनी येथील ग्रामपंचायत निवडणूक निवडणुकी पूर्वीच एकतर्फी दिसत असून आदर्श ग्राम विकास पैनल च्या प्रचाराच्या शुभारंभाने विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसत असून विकास पैनल भ्रष्टाचार मुक्त शासन व आदर्श ग्राम संकल्पना घेऊन निवडणूक रिंगणात असल्याचे पैनल प्रमुखाचे म्हणणे आहे हंचनाळ ता,. देवनी येथील ग्रामपंचायत निवडणूक या वेळेस भ्रष्टाचार विरुद्ध सुशासन असी होणार असे दिसत आहे कारण की मागील काही दिवसांपासून या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित आहेत, येथील भ्रष्टाचार प्रकरण आता नगर विकास मंत्रालयाच्या दालनात असून पुढील काही दिवसात मोठी कार्यवाही होईल असे वाटते, या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा कळीचा होणार हे दिसत असून आदर्श ग्राम विकास पैनल हा मुद्दा घेऊनच निवडणूक रिंगणात उतरला असून या पैनल चा प्रचार शुभारंभ शनिवारी मोठ्या थाटात संपन्न झाला असून प्रचारात आघाडी घेणाऱ्या या पैनल ची धडकी विरोधकानी घेतल्याचे चित्र दिसत असून त्याचे धाबे दणाणले असल्याचे ही गावकरी बोलून दाखवत असल्याने ही निवडणूक आता एकतर्फी होणार का हे पहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी
