जिल्हयातील सर्व मंगल कार्यालय व लॉन्स मध्ये होणाऱ्या लग्नसमारंभास 100 व्यक्तींची मर्यादा -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. उदगीर :- लातूर जिल्हयातील सर्व मंगल कार्यालय / लॉन्स येथे होत असलेल्या लग्न समारंभ व इतर कार्यक्रमामध्ये 100 व्यक्तींच्या मर्यादेत कोविड सुरक्षा नियमांचे (मास्कचा वापर, शारीरीक अंतर, सॅनिटायझर व स्वच्छता ई.) सक्तीने पालन करण्याचे आदेश देत आहे. सदर नियमांचे तंतोतंत पालन होत असल्याचे महानगरपालिका /नगर परिषद, पोलीस प्रशासना मार्फत पथक नियुक्त करुन उक्त नियमांचे पालन होत आहे किंवा नाही याची तपासणी करणेसाठी वेळोवेळी अचानक भेटी देवून तपासणी करावी व नियमांचे पालन होत नसल्यास दंडात्मक कार्यवाही करावी व दुबारा नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास सदर मंगल कार्यालय चालकाविरुध्द गुन्हे दाखल करुन सदर मंगल कार्यालय विशिष्ठ कालावधीकरीता सिल करण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्त्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ,2005 साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम, 2020 ई. मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यता येईल याची नोंद घ्यावी व आदेश तात्काळ लागू असून सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी