मातंग महिला सरपंचास शिवीगाळ करून कामात अडथळा, सरपंच महिलेची उपसरपंचा विरुद्ध तक्रार उदगीर:- हंचनाळ ता. देवणी येथील मातंग महिला सरपंच जाणकाबाई सूर्यवंशी यांची ,जिल्हाधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. लातूर,तहसीलदार व गटविकास अधिकाऱयाकडे लेखी तक्रार उदगीर:- हंचनाळ ता. देवणी येथील नूतन सरपंच ही अनुसूचित जाती जमाती महिला प्रवर्गातील असून येथील उपसरपंच राजकुमार गोविंदराव बिरादार यांनी मला ग्रामपंचायत बैठकीत मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मला माझ्या कर्तव्यापासून रोकले असून त्यांच्या कडून माझ्या जीवितास धोका असल्याची तक्रार सरपंच जाणकाबाई सूर्यवंशी यांनी केली आहे हंचनाळ ता.देवणी येथील सरपंच पद हें अनुसूचित जाती जमातीच्या महिले साठी राखीव होते,या पदावर जाणकाबाई सूर्यवंशी यांची आरक्षना नुसार निवड झाली असून सदर ग्रामपंचायतीच्या पहिल्या मासिक बैठकीत दि.25/2/2021 रोजी उपसरपंच राजकुमार गोविंदराव बिरादार यांनी तू मला सांगून निवडून आलीस का,बघतो तू सरपंच कशी राहतीस म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत माझ्या कर्तव्यापासून रोखले असून सदरील जातीयवादी उपसरपंचा कडून माझ्या जीवास व कुटूंबास धोका असल्याने संबंधितांवर त्वरित कार्यवाही करावी अश्या असयाचे निवेदन जिल्हाधिकारी, जि .प .मुख्यकार्यकारी अधिकारी लातूर,तहसीलदार, गटविकास अधिकारी देवणी याना दिले असुन, या घटनेचा अनेकांनी निषेध करत मातंग समाजावर अन्याय करणाऱ्या संबंधित उपसरपंचावर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी