*उदगीर पोलीस उपअधिक्षक कार्यालयाच्या कार्यकक्षेत देवणी पोलिस स्टेशन कार्यालयाचा समावेश करण्यात यावा* राज्यमंत्री संजय बनसोडे यांची मागणी उदगीर : निलंगा तालुक्यातील पोलीस उपअधिक्षक यांच्या कार्यकक्षेत समाविष्ट असलेला देवणी उप अधिक्षक कार्यालय उदगीर येथील उप अधिक्षक कार्यालयात समावेश करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली आहे देवणी तालुका हा उदगीर पासून 17 कि.मी. आहे तर निलंगा आहे 50 कि .मी .च्या अंतरावर आहे देवणी तालुका हा पूर्वी उदगीर चा मधीलच असल्याने जनतेची उदगीर अशी शैक्षणिक, सामाजिक ,आर्थिक, व्यापारी, व बाजारपेठ इत्यादींच्या माध्यमातून खूप जास्त संबंध आहेत तरी जनतेच्या हितासाठी तसेच प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीने ही देवणी तालुक्याचे पोलीस स्टेशन कार्यालयाचा कार्याभार निलंगा ऐवजी उदगीर कार्यालयास जोडण्यातबाबत विशेष बाब म्हणून निर्णय व्हावा अशी मागणी राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर उपस्थित होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
