रुग्णांना निकृस्ट जेवण देणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करून पोषक जेवण द्या अन्यथा आंदोलन:- पत्रकार उदगीर :- उपजिल्हाधिकारी याना निवेदन देऊन केली मागणी उदगीर:- येथील कोविड सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना ठेकेदार निकृस्ट जेवण देत असल्याचे जेस्ट पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी प्रशासकीय अधिकारी यांना दाखवून ही काहीच न झाल्याने सुरेश पाटील आज रुग्णालयात उपोषणाला बसले असून या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी येथील पत्रकाराणी उपजिल्हाधिकारी याना निवेदन देऊन त्वरित कार्यवाही ची मागणी केली असून अन्यथा आम्हास तीव्र आंदोलन करावे लागेल असे निवेदन दिले असून या वर 20 पत्रकाराच्या सह्या आहेत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांना निकृष्ट जेवण पुरवले जात असून ही बाब तेथे दाखल जेस्ट पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी तहसीलदार,रुग्णालय प्रमुख याना कळऊन ही त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने सुरेश पाटील यांनी आज रोजी रुग्णालयातच उपोषणाला सुरवात केली असून या बाबत प्रशासनास जागे करण्यासाठी येथील पत्रकारानी उपजिल्हाधिकारी याना एक निवेदन देऊन निकृष्ट जेवण देणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करून पोषक जेवण द्यावे अन्यथा आम्हास आपल्या कार्यालया समोर तिव्र आंदोलन करावे लागेल असे निवेदन दिले असून या निवेदनावर पत्रकार सुनील हवा,महेश मठपती, अनिल जाधव,विश्वनाथ गायकवाड, ऍड श्रावणकुमार माने,महादेव घोणे, राजीव किनीकर,माधव रोडगे,इरफान शेख,अर्जुन जाधव, श्रीकृष्ण चव्हाण, संदीप निडवदे,श्रीनिवास सोनी,रामबीलास नावंदर, प्रभूदास गायकवाड, प्रमोद बिरादार, आलमखाने अंबादास,बसवेश्वर डावळे, संगम पटवारी,निवृत्ती जवळे यांच्या सह्या आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

