आम्ही मानस आहोत जेवण तरी व्यवस्थित द्या ,करणार रुग्णालयातच आंदोलन :-पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर :-उदगीर च्या कोविड रुग्णालयात निकृष्ट जेवण,जेस्ट पत्रकार सुरेश पाटील करणार रुग्णालयातच आंदोलन :- उदगीर च्या सामान्य रुग्णालयात जे कोरोना रुग्ण आहेत त्यांना अतिशय निकृष्ट जेवण दिले जात असून तेथे दाखल जेस्ट पत्रकार व स्वातंत्र्य सेनानी सुरेश पाटील रुग्णालयात च 31 मार्च रोजी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे उदगीर येथील सामान्य रुग्णालयात कोरोना चे रुग्ण दाखल आहेत या रुग्णांना निकृस्ट जेवण दिले जात आहे या बाबत जेस्ट पत्रकार व स्वातंत्र्य सेनानी सुरेश पाटील नेत्रगावकर रुग्णालय प्रमुख ,तहसीलदार यांना सांगितले असता त्यांनी त्या तक्रारी कडे दुर्लक्ष करून तुम्ही कुठे ही तक्रार करा म्हणत असल्याने मी 31 मार्च बुधवारी कोविड रुग्णालयातच आंदोलन करून धरणे देणार असल्याचे सुरेश पाटील यांनी उदगीर समाचार ला फोन वरून सांगितले असून एकीकडे शासन करोडो रुपये या रुग्णालयातील रुग्णां वर खर्च करत असून झारीतील शुक्राचार्य हे रुग्णांना असे निकृस्ट जेवण देत असून शासनाने याची त्वरित चौकशी करून कार्यवाही करावी अन्यथा तेथे काही झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
